नवी दिल्ली : सध्या Airtel, Vi, BSNL आणि Jio यांसारख्या मोबाईल नेटवर्क कंपन्या आपल्या ग्राहकांना सेवा देत आहेत. चांगली सुविधा, कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी या कंपन्यांमध्ये मोठी चुरसही दिसून येते. असे असताना आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या Reliance Jio च्या माध्यमातून ग्राहकांना ‘गिफ्ट’ मिळणार आहे.
नवीन वर्षाच्या निमित्ताने डिसेंबरमध्ये यूजर्ससाठी खास न्यू इयर प्लॅन आणला होता. हा प्लॅन मर्यादित कालावधीसाठी सुरू करण्यात आला होता. मात्र, कंपनीने आता या प्लॅनची मुदत वाढवली आहे. हा प्लॅन 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे. Reliance Jio ने नवीन वर्षाच्या निमित्ताने ‘न्यू इयर वेलकम प्लॅन 2025’ आणला होता. या प्लानची किंमत देखील 2025 रुपये आहे.
हा एक Lifetime प्लान आहे, ज्यामध्ये ग्राहकांना 200 दिवसांची वैधता मिळते. जर तुम्हाला दीर्घकाळ रिचार्ज करण्यापासून वाचवायचे असेल तर ही योजना तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. आता तुम्ही या प्लानचा लाभ 31 जानेवारीपर्यंत रिचार्ज करून घेऊ शकता. हा प्लान 200 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि संपूर्ण वैधतेदरम्यान, ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते.
म्हणजेच तुम्ही देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर तुम्हाला हवे तितके कॉल करू शकाल. ग्राहकांना दररोज 100 मेसेज पाठविण्याची सुविधा मिळते. प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 500 GB डेटा मिळतो. अशाप्रकारे युजर्सला दररोज 2.5 GB डेटा मिळतो.