मुंबई : शेअर मार्केटमध्ये सातत्याने घडामोड दिसून येत असतानाच अदानी समूहाने अवघ्या 24 तासांत 64000 कोटी कमावले आहेत. अदानी समूहाच्या शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये वादळी वाढ झाली. काही 20 टक्के वाढले तर काही शेअर्समध्ये 15 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. अदानी स्टॉक्समधील या वाढीचा परिणाम गौतम अदानी यांच्या निव्वळ संपत्तीवर दिसून आला.
आता मंगळवारी अदानी शेअर्समध्ये वाढ दिसून आली. याशिवाय अदानी ग्रीन एनर्जी शेअर 13.52% ने वाढून 1,010 रुपयांवर बंद झाला. अदानी एनर्जी सोल्यूशन्स शेअर्स 12.23 टक्क्यांनी उसळला. हा शेअर 773 रुपयांवर बंद झाला. अवघ्या 24 तासांत त्यात 7.47 अब्ज डॉलर्स (सुमारे 64000 कोटींहून अधिक) वाढ झाली. भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे त्यांच्या संपत्तीतही लक्षणीय वाढ झाली आहे.
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या डेटानुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती $7.47 बिलियनने वाढून $73.5 बिलियन झाली आहे. संपत्तीच्या या आकड्यासह, ते आता जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत 20 व्या स्थानावर आले आहेत.