पुणे : चांगली नोकरी मिळावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी हे उत्तम ठिकाण ठरू शकतं. या ठिकाणी अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्थात घरबसल्या अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला 25 हजारांपर्यंत पगारही मिळू शकणार आहे.
‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’, नागपूर येथे प्रोजेक्ट असोसिएट-I या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 25,000 रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.ncl-india.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रोजेक्ट असोसिएट-I.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वेतन/मानधन : दरमहा रु. 25,000/-.
– वयोमर्यादा : 35 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जानेवारी 2025.