पुणे प्राईम न्यूज डेस्क: या वर्षी दाक्षिणात्य टॉलिवुडने बॉलिवुडपेक्षा दमदार कामगिरी केली आहे. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉलिवुडच्या दिग्गज अभिनेत्यांच्या चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिस गाजवले आहे. आणि अफाट कमाई केली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांना अधिक लोकप्रियता मिळत असल्याचे पाहून अनेक बॉलिवुड कलाकारांचा कल दाक्षिणात्त्य सिनेमांनकडे वाढतो आहे.
यात प्रामुख्याने अली फज़ल हा ‘व्हिक्टोरिया’ ‘अब्दुल’ तसेच ‘मिर्झापूर’ अशा मोठ्या वेब सिरिजमध्ये आपल्या अभिनयाने छाप सोडणारा अली फजल आता दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. तो याच वर्षी रिलिज होणाऱ्या ठग लाईफ या दाक्षिणात्त्यचित्रपटात दिसणार आहे.
यानंतर दूसरा म्हणजे अक्षय ओबेरॉय हा ‘फायटर’ तसेच ‘गुड़गांव’ अशा चित्रपटांतुन पडद्यावर झालकलेला अभिनेता. अक्षय ओबेरॉय हा टॉलिवडूमध्ये पदार्पण करणार आहे. तो टॉक्झिक या चित्रपटात येणाऱ्या काळात दिसणार आहे. या चित्रपटात कियारा आडवाणी, नयनतारा तसेच हुमा कुरेशी अशा दिग्गज कलाकारांसोबत तो काम करणार आहे.
यानंतर बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री करीना कपूर खान जिला बॉलिवुडची राणी म्हणून ओळखली जाते. ही देखील लवकरच दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. ति एक मोठा चित्रपट करणार आहे असं म्हटलं जातंय. मात्र या अगोदरच करिना कपूरने मी टॉलिवुडमध्ये पदार्पण करत असल्याचं सांगीतलं आहे.
शनाया कपूर ही अभिनेत्री “वृषभा” या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवुड आणि टॉलिवुड अशा सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती सुपरस्टार मोहनलाल याच्यासोबत दिसणार आहे. वृषभा एक बिग बजेट फिल्म असून ती तेलुगू, मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.