भंडारा : मनी लाँड्रिंग प्रकरणात बनावट वॉरंट दाखवून १६ लाखांनी फसवणूक केल्याची घटना सेंदुरवाफा येथे घडली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सेंदुरवाफा येथील धनराज मसराम यांना फोनवरून आरोपीने त्यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचे प्रकरण दाखल असल्याचे सांगितले. अटक वॉरंटबाबत बनावट कागदपत्रे व्हॉट्सअॅपर पाठवून दिली.
त्यानंतर आरोपीने त्यांचा विश्वास संपादन करून ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून १६ लाख रुपये आरोपीच्या बँक खात्यात जमा करण्यास प्रवृत्त करून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.