बीड : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण चांगलाच तापलं आहे. अशातच संतोष देशमुख हत्या प्रकणाचा बीडच्या कोर्टात युक्तीवाद पूर्ण झाला आहे. कोर्टाने वाल्मीक कराडला ७ दिवसांची एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे. २२ जानेवारीपर्यंत कराड एसआयटी पोलीस कोठडीमध्ये राहणार आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे वाल्मीक कराडच्या अधकनी वाढल्या आहेत. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या कोर्टात युक्तीवाद पार पडला आहे.
खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडला १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी एसआयटीकडून करण्यात आली होती. युक्तीवादादरम्यान न्यायाधीशांसमोर एसआयटीने हत्या प्रकरणाबाबत अनेक गोष्टी मांडल्या होत्या. एसआयटीने कोर्टासमोर ९ बाबी मांडण्यात आल्या होत्या.
संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी आरोपींनी कट रचला होता. अपहरणाआधी तीन आरोपींमध्ये फोनवरुन चर्चाही झाली. १० मिनिटे त्यांचा फोनवर संवाद सुरु होता. याशिवाय हत्येच्या दिवशी वाल्मीक कराडने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती असेही एसआयटीकडून सांगण्यात आले. हे संघटित गुन्हेगारीचे प्रकरण असल्याने आरोपींवर मकोका लावण्यात आला. एसआयटीच्या टीमने वाल्मीक कराडने केलेल्या गुन्ह्यांची यादी देखील सादर केली. बीड कोर्टातील सुनावणी दरम्यान न्यायाधीश, वकील आणि आरोपी उपस्थित होते.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्याला लपण्यासाठी कोणी मदत केली? याचा तपास घेण्यासाठी पोलीस कोठडी गरजेची असल्याचे एसआयटीकडून सांगण्यात आले. आरोपींमधील चाटे, घुले आणि वाल्मीक कराड यांच्यामध्ये कसले संबंध आहेत? याचाही तपास करायचा आहे असे एसआयटीने कोर्टासमोर सांगितले.
कोर्टाबाहेर राडा..
कोर्टाने वाल्मीक कराडला ७ दिवसांची एसआयटी कोठडी सुनावल्यानंतर कोर्टाबाहेर कराड समर्थकांनी राडा केल्याचे दिसून आले आहे. एका सामान्य माणसाला फसवण्याचा हा सारा डाव आहे. असे कराड समर्थकांनी घोषणाबाजी करत म्हटले आहे.