बुलढाणा : शहरातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या आपल्या पतीला जिवंत पेटवून दिल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर गंभीर अवस्थेतील पतीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. रणधीर गवई असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मृत पतीच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा शहरातील मेहकर तालुक्यामधील पाचला येथील रणधीर आणि लता गवई हे विभक्त राहत होते. अगोदरपासूनच त्यांचा न्यायालयात वाद सूरू होता. तेरा जानेवारीच्या रात्री पती रणधीर पत्नी लताच्या घरी आला होता. दरम्यान रात्री 2 वाजता दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर पाती झोपला असता आरोपी लताने रणधीर याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जीवंत जळल्याचा प्रकार घडला आहे. काहीच वेळात आरडाओरड झाल्यानंतर ही घटना समोर आली.
स्थानिकांनी पटकन आग विझवली आणि या घटनेची सदर माहिती पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचत पती रणधीर याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. यावेळी रूग्णालयात उपचार सूरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यूपूर्वी रणधीरने पोलिसांकडे जबाब नोंदविला होता. या जबाबात अनैतिक संबंधात अडसर ठऱत असल्याने पत्नीने जिवंत पेटवून दिल्याची माहिती दिली होती. यानंतर आरोपी पत्नी लता गवईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच तिच्या विरोधात हत्येचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सूरू आहे.