पुणे : कोल्हापुरातील ‘डिफेन्स करिअर ॲकॅडमी’त आता नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, आता अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन ई-मेलच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
‘डिफेन्स करिअर ॲकॅडमी’ कोल्हापूर येथे प्राचार्य आणि उपप्राचार्य, अध्यापक, शिक्षकेतर प्रशासन या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्राचार्य आणि उपप्राचार्य, अध्यापक, शिक्षकेतर प्रशासन.
– नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 14 जानेवारी 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2025.
– मुलाखतीचा पत्ता : डिफेन्स करिअर ॲकॅडमी, माय स्कूल, चौंडेश्वरी कॉटन मिलजवळ, सांगली-कोल्हापूर हायवे, A/P चिपरी. ता, शिरोळ, जिल्हा-कोल्हापूर, महाराष्ट्र 416101.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://dcaedu.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.