नवी दिल्ली : सध्या अनेकांकडे स्मार्टफोन्स पाहिला मिळतात. ग्राहकांच्या पसंतीनुसार अनेक कंपन्यांकडून स्मार्टफोन्स आणले जात आहेत. असे असताना सुरक्षेच्या दृष्टीने Apple च्या iPhone ला प्राधान्य दिलं जातं. पण, iPhone ही हॅक होऊ शकतो का, याचे संशोधन करण्यात आले. त्यानंतर महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
जगभरात iPhone ला गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने नंबर-1 मानले जाते. पण आयफोनचा USB Type C कंट्रोलर हॅक होऊ शकतो, असा दावा सुरक्षा संशोधकांनी केला आहे. iPhone चा USB Type C हॅक केल्याचा दावा सुरक्षा संशोधकांनी केला आहे. iPhone मध्ये स्थापित USB Type C मध्ये दिलेली Apple सुरक्षा बायपास केली जाऊ शकते. iPhone मध्ये दिलेल्या USB Type C हॅक करून, सायबर गुन्हेगार सुरक्षिततेला बायपास करू शकतात आणि इतकेच नाहीतर कोड देखील इंजेक्ट करू शकतात, अशीही माहिती आहे.
या आयफोनमध्ये देण्यात आलेल्या ACE3 USB Type C कंट्रोलरमधील त्रुटींचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार आयफोन हॅक करू शकतात. डेटा ट्रान्सफर दरम्यान, हॅकर्स आयफोनमधून संवेदनशील माहिती चोरू शकतात आणि सुरक्षा प्रोटोकॉलला बायपास करू शकतात, असेही सांगण्यात आले.