पुणे : गंभीर दुखापत करुन जबरी चोरी करणाऱ्या व दोन महीन्यापासुन फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले आहे. रोहित ऊर्फ नरेश उत्तम अवधुत (वय ३० वर्ष, रा. रामवाडी सिधार्थनगर, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १४) सिल्वर ओक सोसायटी कल्याणीनगर येथे केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर ओलीस स्टेशन पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस अमंलदार बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, महिला पोलीस अमंलदार प्रतिक्षा पानसरे, चालक पोलीस अमंलदार सुहास तांबेकर, असे
गुन्हे शाखा युनिट ६ चे पथक विमाननगर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अमंलदार नितीन मुंढे यांना गोपनीय माहीती मिळाली कि विमाननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५६६/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ११८(२).१८९(२), १९१(२),१९१(३).१९०.३०४, अन्वये या गुन्ह्यातील निष्पन्न पाहिजे आरोपी रोहित ऊर्फ नरेश अवधुत हा कल्याणीनगर येथील सिल्वर ओक सोसायटी येथे येणार असल्याची बातमी मिळाली.
मिळालेल्या बातमीची खात्री करून त्या ठिकाणी जावुन सापळा रचुन आरोपीला शिताफिने पकडून त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव रोहित ऊर्फ नरेश उत्तम अवधुत वय ३० वर्ष रा. रामवाडी सिधार्थनगर असे असल्याचे सांगीतले. पाहिजे आरोपी असल्याचे खात्री करुन त्याला गुन्ह्याच्या पुढील तपासकामी विमाननगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ६ गुन्हे शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस हवालदार रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंळे, सुहास तांबेकर, पोलीस अमंलदार ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, समिर पिलाणे, पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे यांनी केली आहे.