बीड: जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास यंत्रणांकडून सखोल तपास सुरु आहे. सरपंच हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर आहे. आता त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. विरोधकांकडून वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी होत आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीना घेणार का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पत्रकारांकडून विचारण्यात आला. यावर अजित पवार म्हणाले जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनि सांगितले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री कारवाई करत आहेत.
अजित पवार म्हणाले…
वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता अजित पवार यांनी थेट उत्तर दिले आहे . अजित पवार म्हणाले, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री कारवाई करत आहेत. सत्ताधारी असो की विरोधी असो किंवा इतर कोणाचा संबंध या प्रकरणात समोर आला तरी कोणाचीही गय केली जाणार नाही. या प्रकरणातील सर्व आरोपींवर कारवाई होणार आहे.
पोलीस यंत्रणा, सीआयडी आणि एसआयटीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी
या प्रकरणाबाबत अजित पवार पुढे म्हणाले, संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. या प्रकरणातील चौकशीत धागेदोरे कोणाचेही मिळाले तरी त्यांच्यावर कारवाई होणार आहे. पोलीस यंत्रणा, सीआयडी आणि एसआयटीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी होत आहे. तसेच न्यायालयीन चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच सांगितलं आहे.