पुणे : पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक प्रवासाची कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी पेट्रोल पंप व सीएनजी पंप मंगळवारी (ता. १३) नियमित कामकाजाच्या वेळेत सुरु ठेवणार आहे. अशी माहिती पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे ध्रुव रुपारेल यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना रुपारेल म्हणाले कि, सर्वसामान्य जनतेची कोणतीही गैरसोय होऊ नये किंवा त्यांची दहशत निर्माण होऊ नये. व सार्वजनिक हितासाठी नियमित कामकाजाच्या वेळेत पेट्रोल पंप व सीएनजी पंप चालू ठेवणार आहोत. यासाठी पोलिस आयुक्तांसह , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना आणि जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक यांना पत्र लिहिले आहे.
या पत्रामध्ये असे म्हटले आहे कि, पेट्रोल पंप व सीएनजी पंप सुरु ठेवण्यासाठी संरक्षण पुरवण्यात यावे. जेणेकरुन आम्ही सामान्य जनतेला अखंड इंधन पुरवठा करू शकतो. कारण पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येत आहे. असे म्हटले आहे.