पुणे: जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाल्यानंतर महिना उलटून गेल्यानंतरही पोलिसांना अजून एक मारेकरी सापडला नाही. याबरोबरच, पोलीस प्रशासनाकडून तपासाबाबत आम्हला माहिती दिली जात नाही. खंडणी प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्यात यावा, त्यांनाही खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करण्यात यावे अशी मागणी करत धनंजय देशमुखांनी आज मस्साजोग गावात टाकीवर चढून आंदोलन केले. दरम्यान, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना पत्रकारांनी या विषयी प्रश्न करला असता त्यांनी उत्तर दिलं नाही.
पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं पण का ?
या हत्या प्रकरणात, सीआयडीच्या अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का लावावा, या मागणीसाठी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय हे गावातील पाण्याच्या टाकीवर चढले होते. दिवसेंदिवस हे प्रकरण वेगळी वळणं घेत आहे. मात्र मंत्री पंकजा मुंडेंना पत्रकारांनी धनंजय देशमुख यांच्या आंदोलनाविषयी प्रश्न केला असता त्यांनी बोलणं टाळल्याचं पाहायला मिळालं.
पुण्यात उद्योजकता विकास परिषदेसाठी त्या पिंपरी चिंचवडमध्ये आल्या होत्या. यावेळी केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग, केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि एसपी सिंग बगेल उपस्थित होते. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत धनंजय देशमुखांच्या अनुषंगाने पंकजा मुंडेंना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता, प्रोटोकॉलनुसार केंद्रीय मंत्र्यांनी बोलल्यानंतर मला बोलता येणार नाही, असं कारण सांगत मुंडेंनी बोलणं टाळलं आहे.
मी सुद्धा जीव देतो: धनंजय देशमुख
दरम्यान, राज्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग प्रकरण चांगलच तापलेलंन पाहायला मिळत आहे. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील ‘मी स्वत:
जीव देतो’, असे म्हणत टाकीवर चढून आंदोलन केल्याने ग्रामस्थ बराच काळ चिंतेत होते. यानंतर मनोज जरांगे पाटील व धनंजय देशमुख यांच्यात फोनवरुन संवाद झाला. दोघांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले. संतोष देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी समाज रस्त्यावर उतरत आहे. परंतु, बीडच्या नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी याबाबत बोलणं टाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.