पुणे: मागच्या अनेक दिवसापासून राज्यात थंडीचा जोर वाढलेला पहायला मिळत होता. त्यानंतर हवामान विभागाकडून अवकाळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती. सध्या राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. मात्र, थंडी अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील किमान तापमानात देखील वाढ झाली आहे. तरीही सकाळी आणि रात्रीच्या वेळी गारवा कायम असल्याचे दिसून येत आहे.
आज पुणे येथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये धुक्यासह ढगाळ वातावरण असणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये पुण्यातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा या शहरामध्ये 13 जानेवारीला कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. साताऱ्यात दुपारी किंवा सायंकाळी काही प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे.
सोलापूरमध्ये 13 जानेवारीला अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. सोलापूरचे कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये सोलापूर मधील किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ होणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
सांगलीमधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दुपारी किंवा सायंकाळी ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
कोल्हापूरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये दुपारी किंवा सायंकाळी काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं वर्तवली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील्या मुख्य शहरांमध्ये किमान तापमानात वाढ झालेली पहायला मिळत आहे. किमान तापमानात वाढ झाली असली तरीही काही भागांत गारवा जाणवत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण कायम असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गराजचे आहे.