सासवड: पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि पुरंदर तालुका कुस्तीगीर संघ व पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धा समितीच्या विद्यमाने, माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि.१०) सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी कुस्ती संकुलामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ साठी पुरंदर तालुक्यातून मल्लांची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. दि १८ व १९ जानेवारी रोजी कोंढवा बु. (पुणे) येथे जिल्हा स्तरावरील निवड चाचणी स्पर्धा होणार आहेत.
यावेळी महाबली हनुमानाच्या प्रतिमेचे तसेच आखाड्याचे पुजन माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, माजी उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, राष्ट्रीय पंच व भारतीय शैली कुस्ती प्रकाराचे राज्याचे सचिव मोहन खोपडे, जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, सदस्य अशोक झेंडे, तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव रविंद्रपंत जगताप, उपाध्यक्ष पांडुरंग कामथे, सदस्य गुलाब झेंडे, रमेश जगताप, रघुनाथ जगताप, शरद जगदाळे, तानाजी काकडे, बाळासो रासकर, संदीप खेसे, सोमनाथ शिंदे, योगेश शिंदे, छत्रपती शिवाजी कुस्ती संकुलाचे प्रशिक्षक माऊली खोपडे, तानाजी जाधव उपस्थित होते.
पंच रोहिदास आमले यांसह आर व्ही जगताप, प्रल्हाद कारकर, संजय भिंताडे, मोहन नातू, संभाजी शिंदे यांनी परीक्षण केले. सचिव रविंद्रपंत जगताप यांनी प्रास्ताविक, प्रल्हाद कारकर यांनी सुत्रसंचलन केले तर राजेंद्र जगताप यांनी आभार मानले.
गटनिहाय विजेते, उपविजेते, गावाचे नाव पुढीलप्रमाणे: बालगट – २५ किलो – राजवीर काळे (भिवडी), जीवन सोनवणे (सोनोरी). २८ किलो – शिवांश काळे(भिवडी), अथर्व जाधव(काळदरी). ३२ किलो – श्लोक जगताप (सासवड), स्वराज देशमुख (सासवड). ३६ किलो – यश भोसले (निरा), तन्मय महांगरे (काळदरी). ४० – सोहम मोटे (जेजुरी), आर्यन शिंदे (पिंपरे खुर्द). ४४ किलो – यश पेटकर (बांदलवाडी), यश चौंडकर (नायगाव). ५५ किलो – मयुरेश डांगे ( नारायणपूर). ६० किलो – ध्रुव रासकर (सासवड).
महाराष्ट्र केसरी निवड चाचणी: गादी विभाग ( विजेते, उपविजेते पुढीलप्रमाणे ) – ५७ किलो – चैतन्य काळे (सोनोरी). ६१ किलो – संग्राम काकडे (पांगारे). ६५ किलो – संग्राम जगताप (सासवड). ७० किलो – शिव वांढेकर (भिवडी), अभिजित भोंडे (सासवड). ७४ किलो – प्रसाद जगदाळे (पिसर्वे). ७९ किलो – रितेश मुळीक (सासवड). ८६ किलो – यशराज काळे (काळेवाडी). ९२ किलो – विपूल गायकवाड (भिवडी). ९७ किलो – विशाल जाधव (सासवड). खुला गट – प्रतिक जगताप (सासवड).
माती विभाग: ५७ किलो – सनी जगताप (काळदरी). ६१ किलो – श्रीनाथ डांगे ( नारायणपूर). ६५ किलो – चैतन्य बरकडे (पिसुर्टी). ७० किलो – जयेश गार्डी (जेऊर). ७४ किलो – ओंकार गायकवाड (पिंपरे खुर्द). ७९ किलो – प्रतिक जगदाळे (पिसर्वे). ९२ किलो – स्वराज गायकवाड (नारायणपूर). ९७ किलो – ऋषिकेश शिंदे (पिंपरे खुर्द). खुला गट – धनराज काळे (काळेवाडी).