Bigg Boss 18: बिग बॉस १८ च्या अंतिम फेरीला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. सलमान खानचा शोचा शेवटचा आठवडा बाकी आहे. ज्यामध्ये येणारे स्पर्धक म्हणजे विवियन डिसेना, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोडकर, चुम दरंग आणि ईशा सिंग. आता यापैकी एक स्पर्धक बाहेर पडताच, बिग बॉस सीझन १८ ला त्याचे टॉप ५ स्पर्धक मिळणार आहे. परंतु, बिग बॉस १८ चा ग्रँड फिनाले कधी आणि किती वाजता सुरू होईल आणि विजेत्या स्पर्धकाला किती रुपयांचे बक्षीस मिळणार? याबाबत जाणून घेऊया.
बिग बॉस १८ शोचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा आठवडा बाकी आहे. तसेच आता प्रेक्षकांनी त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला जिंकून देण्यासाठीची तयारी सुरू केली असणार आहे. बिग बॉसकडून पहिल्याच दिवशी घोषणा करण्यात आली होती की विवियन डिसेना टॉप २ मध्ये असणार आहे. आता जर आपण पाहिले तर, उर्वरित सर्व स्पर्धकांमध्ये टॉप २ मध्ये राहण्यासाठी लढाई सुरू असून प्रेक्षकांकडून बिग बॉसच्या या सीझनवर पक्षपातीपणाचा आरोप करण्यात येत आहे. या वर्षी विजेत्याला काय मिळेल हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे.
ग्रँड फिनाले कुठे आणि कधी पाहायचा?
बिग बॉस १८ च्या खेळाच्या आणि मतदानाच्या आधारे मतदान केले जात आहे. या शोचा शेवट १९ जानेवारी २०२५ रोजी होणार असून सलमान खानसोबतचा हा भव्य अंतिम सोहळा रात्री ९ वाजता कलर्सवर सुरू होणार आहे. सलमान खानच्या बिग बॉस १८ चा शेवट सुमारे ३ तास चालणार आहे. कलर्स सोबतच, बिग बॉस १८ चा शेवट देखील जिओ सिनेमावर प्रसारित करण्यात येणार आहे. म्हणजेच बिग बॉस १८ चा शेवट चाहत्यांना आपल्या फोनवर सुद्धा पाहता येणार आहे.
विजेत्याला किती रक्कम मिळणार?
दरवर्षी शो जिंकणाऱ्या स्पर्धकाला काय मिळेल यावर प्रेक्षकांचे लक्ष लागून असते. पण शोच्या सुरुवातीपासूनच हे स्पष्ट झाले आहे की बिग बॉस १८ च्या विजेत्याला ५० लाख रुपये आणि बिग बॉसची चमकदार ट्रॉफी दिली जाणार आहे.