पुणे : मकर संक्रांतीच्या दिवशी विशेषतः पतंग उडवून हा सण साजरा केला जातो. आता मात्र तुम्ही किंवा तुमचे मुलं संक्रांतीला पतंग उडवणार असतील तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मकर सक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुलांनी चायनीज मांजाने पतंग उडवल्यास थेट पालकावर कारवाई केली जाणार असून त्यांना थेट तुरुंगात जावे लागणार आहे.
कारण, शहरात चायनीज मांजावर बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जात आहे. गेल्या काही दिवसांत चायनीज (नायलॉन) मांजामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेत चाईनीज मांजा वापरुन जर मुलांनी पंगत उडवली तर थेट पालकांवर कारवाई केली जाणार आहे. या अंतर्गत संबंधित पालकांवर गुन्हा देखील दाखल केला जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
शहरात चीनी मांजावर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होतो. यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी हा धडाकेबाज निर्णय घेतला आहे. बंदी असतानाही काही दुकानदार लपूनछपून हा मांजा विकत असतात. मागील काही दिवसांत या मांजाने काही लोक गंभीर जखमी झाले आहेत.
संक्रातीच्या निमित्ताने अनेक दुकानांवर पंतग आणि मांजा घेण्यासाठी गर्दी होत आहे. प्राशासनाने होणाऱ्या अप्रिय घटना लक्षात घेत चायनीज मांजावर बंदी घातली आहे. असे असताना देखील अनेक दुकानदार चायनीज मांजाची सर्रास विक्री होत आहे. चायनीज (नायलॉन) मांजामुळे पुण्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तीन दिवसांपूर्वी शहरात अशीच घटना घडली असून नायलॉन मांजा गळ्यात अडकून एका व्यक्तीचा गळा कापला गेला.
या घटनेत तो व्यक्ती गंभीर जखमी होत त्याला तब्बल 32 टाके ३२ टाके पडल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी सतीश फुलारी मुलीला शाळेतून घेऊन येत असताना कात्रज-कोंढवा रस्त्यावर त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकत त्यांचा गळा कापला होता. या घटनेत ते सुदैवाने वाचले. या सर्व घटनांचे गांभीर्य लक्षात घेता पुणे पोलिसांनी मांजा विकणाऱ्यांवर तसेच हा मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.