अहमदाबाद : तिसरीत शिकणाऱ्या ८ वर्षे वयाच्या मुलीचा शाळेतच हृदविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुजरातच्या अहमदाबाद शहरात शुक्रवारी घडली आहे. वर्गात जाताना अचानक भोवळ येऊन ही मुलगी बेशुद्ध झाली. यातच हृदविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच बेंगळुरूमध्ये एका ८ वर्षीय मुलीचा असाच हार्ट अॅटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
‘जेबर स्कूल फॉर चिल्ड्रन’ या नामांकित शाळेत शिकणारी गार्गी रानपारा तोल सांभाळत वर्गात जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असून, एकदम ती तेथे असलेल्या एका खुर्चीवर बसली. शिक्षक आणि इतर विध्यार्थ्यांसमोरच ती खुर्चीतून जमिनीवर कोसळली आणि गतप्राण झाली. शाळेत आली तेव्हा गार्गी नॉर्मल होती, असे मुख्याध्यापिका शर्मिष्ठा सिन्हा यांनी सांगितले.
शाळेच्या कॉरिडॉरमध्येच तिला श्वास घेण्यास त्रास झाला आणि ती बेशुद्ध पडली. शिक्षकांनी तिला कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) दिला आणि तत्काळ अॅम्ब्यूलन्स बोलावली. एका खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी गार्गीला हृदविकाराचा झटका आल्याचे सांगितले. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले, परंतु वाचविण्यात अपयश आले, असे मुख्याध्यापिका सिन्हा म्हणाल्या.
View this post on Instagram