पुणे : पुणे शहर पोलीस दलातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. प्रशासकीय कारणास्तव तात्पुरती नेमणुक करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेशात म्हटले आहे.
विठ्ठल दिगंबर दबडे (विशेष शाखा, १ ते खडकी विभाग), अनुजा अजित देशमाने (खडकी विभाग ते फरासखाना विभाग), अनुराधा विठ्ठल उदमले (विशेष शाखा २ ते हडपसर विभाग), नुतन विश्वनाथ पवार (फरासखाना विभाग ते विशेष शाखा २),अतुलकुमार यशवंत नवगिरे (वाहतूक शाखा ते विशेष शाखा १), अश्विनी गणेश राख (हडपसर विभाग ते वाहतूक शाखा) तसेच दहा सहायक पोलीस निरीक्षक आणि १५ पोलीस उपनिरीक्षक यांच्या त्यांच्या विनंतीनुसार अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.