आपल्या निसर्गात अनेक अशा गोष्टी आहेत त्याचा फायदा आपल्याला होत असतो. पण, काहींना याची माहिती कदाचित नसेल की गाजरही चांगलेच फायदेशीर असते. कारण, गाजरामध्ये बिटा कॅरेटिन असतं. ते कॅन्सरला प्रतिबंधक ठरतं. पालक आणि गाजराचा रस एकत्र करून प्यायल्यास तब्येत सुधारते. गाजरात ‘जीवनसत्व अ’ असतं. रोज एक गाजर खाल्ल्यानं चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.
गाजरामुळे वजन वाढत नाही. त्यामुळे तुम्ही रोज एक गाजर खाऊ शकता. गाजरात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी, ए असतं. त्यानं हृदयरोगावरही मात करता येते. थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो. गाजरापेक्षा गाजराच्या पानांमध्ये लोह असतं. त्यानं अॅनिमिया दूर होतो. थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात उब राहते. गाजराचा रस आणि मध एकत्र करून प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
तसेच रोज एक कच्च गाजर खाल्ल्यानं त्याचा शरीराला जास्त फायदा होतो. गाजरांच्या पानांची भाजी तयार केली जाते. ती बनल्यावर उरलेलं पाणी पिता येऊ शकते. त्यात पोषकद्रव्य असतात. याशिवाय तुम्ही घरामध्ये गाजराचे विविध पदार्थ तयार करून खाऊ शकता.