सध्या शेअर मार्केट, सोने-चांदीसह SIP मध्ये गुंतवणुकीचा कल वाढला आहे. कारण, यातून चांगला परतावाही मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार याकडे आकर्षित होताना दिसत आहेत. जर तुम्ही SIP मध्ये 1000, 2000, 3000 आणि 5000 ची गुंतवणूक करत असाल तर तुम्ही करोडपती व्हाल. पण कधी याचीच माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जर तुम्ही SLIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1000, 2000, 3000 आणि 5000 ची मासिक SIP करू शकता. तुम्ही 10 टक्के वार्षिक स्टेप अपसह मासिक 1000 रुपये गुंतवल्यास आणि वार्षिक सरासरी 12 टक्के परतावा अपेक्षित असल्यास, तुम्ही 31 वर्षांत 1.02 कोटी रुपये जमा करू शकता. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 21.83 लाख रुपये असेल आणि उर्वरित 79.95 लाख रुपये परतावा मिळतील.
तसेच जर तुम्ही दरमहा 2000 ची SIP सुरू केली आणि वार्षिक 10 टक्के दराने तुमची गुंतवणूक वाढवली, तर 27 वर्षांत तुमच्याकडे 1.15 कोटी असतील. मात्र, 12 टक्के परतावा मिळणे महत्त्वाचे आहे. यामध्ये एकूण गुंतवणूक २९.०६ लाख रुपये असेल, तर परताव्यातून मिळणारी रक्कम 85.69 लाख रुपये असेल.
तसेच जर एखाद्या व्यक्तीने मासिक 3000 रुपयांच्या गुंतवणुकीसह SIP सुरू केली आणि त्यात दरवर्षी 10 टक्के वाढ केली. तर 12 टक्के वार्षिक परताव्यावर, 24 वर्षांत 1.10 कोटी रुपये जमा होतील. यामध्ये गुंतवलेली एकूण रक्कम 31.86 लाख रुपये असेल, तर परताव्यातून मिळणारे उत्पन्न 78.61 लाख रुपये असेल.