पुणे : जर आपल्यापैकी अनेकांची बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या क्षेत्रिय कार्यालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या अकोला येथील क्षेत्रीय कार्यालयात ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. प्राध्यापक, ऑफिस असिस्टंट, अटेंडर, वॉचमन कम गार्डनर यांसारख्या पदांवर भरती केली जात आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अकोला येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 5 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.centralbankofindia.co.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्राध्यापक, ऑफिस असिस्टंट, अटेंडर, वॉचमन कम गार्डनर.
– एकूण रिक्त पदे : 05 पदे.
– नोकरीचे ठिकाण : अकोला.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जानेवारी 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रादेशिक व्यवस्थापक/सह-अध्यक्ष, जि. स्तर RSETI सल्लागार समिती (DLRAC), सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय-अकोला, आदर्श कॉलनी, अकोला 444004.