पुणे: नोटीस बजाविण्यासाठी गेलेल्या निर्वाह निधी कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला व्यावसायिकाने धक्काबुक्की करुन शिवीगाळ केल्याची घटना शिवाजीनगर भागात घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकारी गौरी माळी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी थकल्याप्रकरणी व्यावसायिकाला नोटीस बजाविण्यात आली होती. नोटीस बजाविण्यासाठी त्या व्यावसायिकाच्या कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी वाद घालून माळी यांना शिवीगाळ केली. माळी यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला व जमिनीवर आपटला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पांढरे करत आहेत.