पुणे : सेना दिवसाच्या संचलन परेडच्या पार्श्वभूमीवर येरवडा, विश्रांतवाडी आणि खडकीतील काही रस्त्यांवर तात्पुरता वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शनिवार (दि. ११) आणि बुधवार (दि. १५) असा दोन दिवस सकाळी सात ते अकरापर्यंत हा वाहतूक बदल असणार आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
असे आहेत वाहतुकीत बदल?
- शादलबाबा चौकाकडून चंद्रमा चौकामार्गे खराडीकडे जाणारी वाहतूक बंद. त्यामुळे वाहनचालकांनी आंबेडकर चौक, आळंदी जंक्शन, साप्रस जुना होळकर ब्रिज मार्गे पुढे जावे.
- विश्रांतवाडीकडून होळकर ब्रिजमार्गे खडकीकडे जाणारी वाहतूक बंद असणार आहे. त्या वेळी वाहनचालकांनी विश्रांतवाडी, साप्रस जुना होळकर ब्रिजमार्गे किंवा शादलबाबा, संगमवाडी, पाटील इस्टेटमार्गे जावे लागणार आहे.
- बोपोडी चौक खडकी बाजार मार्गे, चर्च चौक जनरल करीअप्पा मार्गावरून मेथलिक चर्च, अर्जुनमार्ग पाचवड चौक येथून पुढे होळकर ब्रिजमार्गे येरवडा, विश्रांतवाडीकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाकडेवाडी पाटील इस्टेटमार्गे जावे लागणार आहे.
- पोल्ट्री फॉर्म चौक पोल्ट्री अंडरपास कडून आठमुळा रोडला जाण्यासाठी प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. या वेळी वाहनचालकांनी वाकडेवाडी, पाटील इस्टेट-संगमवाडी, शादलबाबामार्गे पुढे जावे लागणार आहे.