पुणे : कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तुम्हाला नोकरी मिळू शकते. याठिकाणी संधीही उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, आता अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तांत्रिक अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 35000 रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://rcsmgmc.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : तांत्रिक अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर.
– वेतन/ मानधन : दरमहा रु. 35,000/-.
– वयोमर्यादा : कमाल 60 वर्षे
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जानेवारी 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : राज्य संदर्भ प्रयोगशाळा, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, दुसरा मजला, आरसीएसएम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडा पार्क, कोल्हापूर ४१६०१३.