उरुळी कांचन, (पुणे) : ग्रामिण भागातील महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कै. महादेव गाढवे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रोझ प्रीस्कुल, सोरतापवाडी (ता. हवेली) येथे पाककला स्पर्धेचे आयोजन शनिवारी (ता. १०) करण्यात आले होते.
या स्पर्धेत तरडे व सोरतापवाडी गावामधील महिलांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला होता. उपस्थित असलेल्या सर्व स्पर्धकांचे पुष्पगुष्छ देऊन स्वागत करण्यात आले नंतर त्यांना टोकण नंबर दिले. या स्पर्धेत महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन, पंजाबी, चायनिज इ. वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याचे पदार्थ बनविण्यात आले होते.
सर्व स्पर्धकांचे स्वागत व आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अजय गाढवे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे सर्व शिक्षकवृंद नवनाथ लगाडे यांच्यासह आदी शिक्षकांनी केले. या स्पर्धेचे परिक्षण अलका गोपाळ हूड व रंजिता गाढवे यांनी केले.