नवी दिल्ली : सध्या ऑनलाईन शॉपिंग करण्याला अनेकजण प्राधान्य देतात. यातून मोठा डिस्काउंट दिला जातो. जर तुम्हाला डिस्काउंटमध्ये खरेदी करायची असेल तर थोडं थांबणं फायद्याचे ठरू शकते. कारण, Amazon ने आपल्या वर्षातील पहिला मोठा सेल ‘ग्रेट रिपब्लिक डे सेल’ जाहीर केला आहे.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त ही विक्री होते. या सेल दरम्यान, ॲमेझॉन स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, पीसी आणि इतर अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना घरगुती आणि स्वयंपाकघरातील उपकरणे, टीव्ही आणि इतर उत्पादनांवरही आकर्षक ऑफर मिळू शकतात. ‘ग्रेट रिपब्लिक डे’ सेल ही ग्राहकांसाठी कमी किमतीत त्यांची आवडती उत्पादने खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.
Amazon चा ‘ग्रेट रिपब्लिक डे सेल’ 13 जानेवारीला दुपारी 12 वाजता सुरू होईल. परंतु Amazon Prime Members 12 तास आधी म्हणजेच 13 जानेवारीच्या मध्यरात्री 12 पासून सेलमध्ये खरेदी करू शकतील. Amazon च्या ‘ग्रेट रिपब्लिक डे सेल’मध्ये तुम्हाला अनेक आकर्षक ऑफर मिळतील. तुम्हाला SBI क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 10% अतिरिक्त सूट मिळेल, ज्यामध्ये EMI वरही खरेदी करता येणार आहे.