नवी दिल्ली: भारतातील सेवा क्षेत्राची वाढ डिसेंबरमध्ये चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली, मजबूत मागणी परिस्थित्ती आणि महागाईचा दबाव कमी करताना नवीन ऑर्डर्सने पाठिंबा दिला. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या मासिक सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे.
हंगामी समायोजित एचएसबीसी इंडिया सेवा व्यवसाय क्रियाकलाप निर्देशांक नोव्हेंबरमधील ५८.४ वरून डिसेंबरमध्ये ५९.३ वर पोहोचला. चार महिन्यांतील विस्ताराचा हा सर्वात मजबूत दर आहे. पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) च्या भाषेत, ५० पेक्षा जास्त स्कोअर म्हणजे क्रियाकलापांचा विस्तार आणि ५० पेक्षा कमी स्कोअर म्हणजे आकुंचन. सर्वेक्षणानुसार, मागणीत वाढ झाल्यामुळे नवीन ऑर्डरमध्ये वाढ झाली, ज्यामुळे उत्पादन वाढीला समर्थन मिळाले. एचएसबीसी अर्थशास्त्रज्ञ इनेस लॅम म्हणाले की, भारतातील सेवा कंपन्यांनी डिसेंबरमध्ये मजबूत आत्मविश्वास दाखवला, कारण व्यावसायिक क्रियाकलाप वाढ चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली.
नवीन ऑर्डर आणि भविष्यातील घडामोडी सूचित करतात की, त्याची मजबूत कामगिरी नजीकच्या भविष्यात सुरू राहण्याची शक्यता आहे. किमतीच्या आघाडीवर, खर्चाच्या ओझ्यामध्ये माफक प्रमाणात वाढ झाली होती, जरी सर्वेक्षण प्रतिसादकत्यांनी अन्न, श्रम आणि सामग्रीवर जास्त खर्च नोंदवला. नवीन बिझनेस ऑर्डर आणि आऊटपुट मंदावल्यामुळे डिसेंबरमध्ये भारतातील उत्पादन क्षेत्राची वाढ १२ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली.