पळसदेव: महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासाचे साक्षीदार होण्यासाठी संघटन प्रभारी रवींद्र चव्हाण , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाध्यक्ष वासुदेवनाना काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनपर्व सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ श्रीक्षेत्र बाबीरदेव गड रुई(ता .इंदापूर) येथून करण्यात आला.
यावेळी इंदापूर तालुक्यातील ५० हजार भाजप सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य मारुती वणवे,जिल्हा महामंत्री आकाश कांबळे,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ गजानन वाकसे,तालुका अध्यक्ष तेजस देवकाते,सरचिटणीस राम अजबे, सदानंद शिरदाळे, रमेश खारतोडे, जिल्हासचिव प्रेम जगताप,रवींद्र पाटील, सरचिटणीस संदीप आदलिंग,ओबीसी मोर्चा सचिव आबासाहेब थोरात, तानाजी मारकड, प्रवीणकुमार शहा, अविनाश मोहिते आदिंसह जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षादेशातील लाडक्या बहिणीसाठी, शेतकरी सन्मान योजना टिकवण्यासाठी, शिक्षण घेणाऱ्या मुलींची मोफत प्रवास योजना टिकवण्यासाठी, महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास योजना सुरू राहण्यासाठी भाजप सरकार वरदान ठरत आहे.
8800002024 या नंबरवर मिस कॉल दिल्यावर एक लिंक येईल त्या लिंक मध्ये स्वतःचा मोबाईल नंबर टाकून नंतर ओटीपी टाकून आपली संपूर्ण माहिती भरून घ्या व भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य व्हा.असे आवाहन यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.