पुणे: आरटीई प्रवेशप्रक्रियेतील शाळा नोंदणी प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, १३ जानेवारीपासून विद्यार्थी नोंदणीला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत राज्यातील ८ हजार ६२४ खासगी शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंदणी केली आहे. त्या माध्यमातून १ लाख ५ हजार ५६४ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत.
यंदा प्रवेशप्रक्रियेसाठी १८ डिसेंबरपासून शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. नोंदणीसाठी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र संस्थाचालकांच्या उदासीनतेमुळे अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे ४ जानेवारीपर्यंत शाळा
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबवण्यात येणारी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया जानेवारी महिन्यात सुरू होणार आहे. त्यामुळे यंदा पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची सुविधा लवकर उपलब्ध होणार आहे. सध्या या प्रवेशप्रक्रियेत शाळांची नोंदणी सुरू आहे. नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यामध्ये वाढ करण्यात आली होती.
सध्याच्या परिस्थितीत अनेक खासगी शाळांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. खासगी शाळांकडून जानेवारी महिन्यापर्यंत आपली प्रवेशप्रक्रिया पूर्ण करून, एप्रिल महिन्यात काही काळासाठी शाळा सुरू करण्यात येतात. त्यानंतर जूनपासून नियमित शाळा सुरू होते. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाला एप्रिल महिन्यापर्यंत ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यंदा जानेवारीत प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यास, ही प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रवेशप्रक्रियेतून प्रवेश घेणारे विद्यार्थीही, नियमित विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेऊ शकतील.