पुणे प्राईम न्यूज डेस्क: इंग्लंड विरुद्धची वनडे सीरीज ही भारतीय संघासाठी चॅम्पियन ट्रॉफीची रंगीत तालिम ठरणार आहे. या सीरीजमुळे भारतीय संघाला आपल्या तयारीचा आढावा घेण्याची आणि योग्य संघ निवडीसाठी फायदा होणार आहे. आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासमोर असा प्रश्न आहे की, विकेटकीपर फलंदाज कोण असेल? खेळणाऱ्या अकरा मध्ये कोणाला संधी मिळेल? यासाठी केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये स्पर्धा सुरू आहे. हे दोघेही बहुतांशवेळा पाचव्या नंबरवर फलंदाजी करताना दिसले आहेत. भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने दुबईत खेळायचे आहेत. अशावेळी ऋषभ पंत आणि राहुल यांच्यामध्ये एकाची निवड करायची आहे. या दोघांचा विचार करताना गौतम गंभीर मैदानावरील परिस्थितीनुसार विचार करून कोणाला संधी देणार हे पाहावं लागणार आहे.
केएल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांवर जास्त लक्ष
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाच्या खेळणाऱ्य अकरा मध्ये कोण-कोण असेल?. बहुतांश खेळाडूंची नावं ठरली आहेत.पण इंग्लंड विरुद्धच्या सीरीजमधून कोण किती उत्तम कामगिरी करत आहे? संघाची तयारी कशी आहे? ते समजेल आणि मग निर्णय घेतला जाईल. यात खेळाडूंचा सध्याचा फॉर्म पाहिला जाईल. यावेळी केएल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांवर जास्त लक्ष असणार आहे.
कोणाच प्रदर्शन चांगलं आहे?
ऋषभ पंत आणि केएल राहुल यांच्यामध्ये दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर कोणाचं प्रदर्शन चांगलं आहे?. ऋषभ पंतकडे दुबईत एकही सामना खेळण्याचा अनुभव नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने त्याला दुबईत पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळेल. केएल राहुलने 6 वर्षापूर्वी दुबईमध्ये फक्त एक वनडे सामना खेळला आहे. यात त्याने 60 धावा केल्या होत्या. संघात निवडीसाठ सध्याचा फॉर्म कसा आहे? ते महत्त्वाचं ठरणार आहे.
दोघांपैकी कोणता खेळाडू सामना जिंकून देऊ शकतो
पंत आणि राहुल यांच्या सध्याच्या फॉर्मचा निर्णय इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये होईल. त्यानंतर गौतम गंभीर दोघांपैकी एकाला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळवण्याचा निर्णय घेऊ शकतात. इंग्लंड विरुद्ध दोघांची बॅट तळपली, तर भारतीय टीम मॅनेजमेंट राहुलला नंबर 4 वर खेळवण्याचा निर्णय घेऊ शकते. फॉर्ममध्ये असूनही दोघांपैकी एकाला खेळवण्याचा निर्णय झाला, तर मग पंतला संधी मिळू शकते. कारण मिडल ऑर्डरमध्ये तो फलंदाजीत वैविध्य मिळवून देतो. आणि मॅच विनर आहे. सर्वात महत्त्वाच म्हणजे तो डावखुरा फलंदाज आहे. यावर संघ व्यवस्थापणाला अंतिम निर्णय घ्यायचा आहे.