पुणे प्राईम न्यूज डेस्क: उपाशी पोटी गरम पाणी पिण्याचे भरपूर फायदे आहेत. गरम पाणी पिल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. तसेच तूप खाण्याचे देखील खूप फायदे आपल्या शरीराला होतात. परंतु गरम पाणी आणि तूप एकत्र करून पिलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात पोषक घटक मिळतात.
त्याच बरोबर अनेक जणांना अपचनाचा देखील त्रास होत असतो. यामुळे आपल्या तोंडातलं देखील येतं तर यासाठी जर तुम्ही हे गरम पाण्यात तूप टाकून पिल्याने आपल्या शरीराला त्याचा भरपूर फायदा होतो. आपलं पोट साफ होतं आणि तुम्हाला अपचनाचा देखील त्रास होणार नाही. साधारणतः पाच ते दहा ग्रॅम तूप दररोज पाण्यात टाकून घ्यावे म्हणजे एक चमचा येवढं. यामुळे शरीराला भरपूर फायदा होतो.
तूप आणि गरम पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे?
ज्यांना रुग्णांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे . त्याचबरोबर जे रात्री उशिरापर्यंत काम करतात अश्या लोकांनी उपाशी पोटी सकाळी एक चमचा तूप पाण्यात टाकून घ्यायला हवं. यामुळे पोट साफ व्हायला मदत होते आणि तुमच्या आतड्यांना एक प्रकारचं संरक्षण देखील मिळतं. जर तुम्हाला दररोज हे तूप पाण्यात टाकून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही गाईचे शुद्ध तूप वापरायला हवे कारण गाईचे तूप हे म्हशीच्या तुपापेक्षा अतिशय शुद्ध आणि पोषक असते असं आहार तज्ञांचं म्हणणं आहे.
पण दररोज हे उपाशीपोटी घेणे गरजेचे आहे. यामध्ये तुमची नियमितता असणे आवश्यक आहे तरच याचे फायदे मिळतात. आणि यामुळे वजनही कमी होण्यासाठी मदत होते. तुम्ही व्यवस्थित रित्या हे दररोज घेतलं तर तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही निरोगी राहील, असं आहार तज्ञांचं म्हणणं आहे.