पुणे : उत्तम केटरर्स, अमनोरा, जीबी इन्फ्रा, महालक्ष्मी ग्रुप संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाना पराभूत करताना एएवाय’एस (आईज) सॉफ्टबॉल अकादमीच्या वतीने राज्यस्तरीय सॉफ्टबॉल लीग स्पर्धेत विजयी सलामी दिली.
स्पर्धेचे उद्घाटन नरेंद्र पाटील, दत्तात्रय गोटे, भरत देसडला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एएवाय’एस (आईज) सॉफ्टबॉल अकादमीचे अध्यक्ष अजय राणे, सचिव राजेंद्र मिसाळ, छत्रपती पुरस्कार विजेते दत्ता मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स. प. महाविद्यालयाच्या मैदनावर आजपासून सुरू झालेल्या स्पर्धेत महालक्ष्मी ग्रुप संघाने एसके ग्रुप संघाला ९-२ असे ७ होमरनने पराभूत करताना विजयी सलामी दिली. महालक्ष्मी संघाकडून राज भिलारे २, प्रीतीश पाटील, मोहित पाटील, उमेद विसपुते, कल्पेश कोल्हे, कल्पेश जाधव, निखिल कोल्हे व अभिजित सोनावणे यांनी प्रत्येकी १ होमरन केला. पराभूत एस के संघाकडून मंगेश देसाई व रोहित पाटील यांनी प्रत्येकी १ होमरन केला.
उत्तम केटरर्स संघाने मोहर संघाला ६-१ होमरनने पराभूत केले. विजयी उत्तम केटरर्स संघाकडून स्वप्नील गदादेने २ तर गणेश भराटे, शुभम काटकर, विनीत सपकाळ, चैतन्य पवार यांनी प्रत्येकी एक होमरन केला. पराभूत मोहर संघाकडून निखिल देशमुख याने एक होमरन केला.
अमोनोरा संघाने एसके ग्रुप संघाला ७-५ असे दोन होमरनने पराभूत केले. अमोनोरा संघाकडून विजय खडासेने २ तर अस्मित जहा, अजय खेडकर, नचिकेत पाटील, विश्वजीत थापा, गणेश धनावडे यांनी प्रत्येकी एक होमरन केला. पराभूत एसके ग्रुप संघाकडून प्रथमेश देसाई, निखिल कोटकर, तेजस नेमगोंडा, आदित्य पाटील, विनायक पाटील यांनी प्रत्येकी १ होमरन केला परंतु ते संघाला विजय मिळवून देवू शकले नाहीत.
जीबी इफ्रा संघाने योहान पूनावला संघाला ५-४ असे पराभूत केले. जी बी इफ्राला संघाकडून प्रणव भोंगाडे रोहित नाकाडे यांनी प्रत्येकी २ तर आदित्य म्हस्केने १ होमरन केला. पराभूत योहान पूनावाला संघाकडून संदीप शिंदे, क्षितीज फडकर, केतन बनसोडे व समीर पांचपोर यांनी प्रत्येकी १ होमरन केला, परंतु त्यांना पराभूत व्हावे लागले.
स्पर्धेतील अन्य लढतीत उत्तम केटरर्स संघाने बढेकर ग्रुप संघाला २-०, गोखले कन्स्ट्रक्शन संघाने पंडित जावडेकर संघाला ५-०, महालक्ष्मी ग्रुप संघाने अमेनोरा संघाला ७-५ असे पराभूत केले. श्लोक इन्सुलेशन संघाने पंडीत जावडेकर संघाचा ८-० तर जीबी इफ्रा संघाने सार्थक कॉर्पोरेशन संघावर ८-७ असे पराभूत केले.