पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात प्रकल्प सहाय्यक आणि निरीक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला परभणी येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 8 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 15,000 ते 25,000 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.vnmkv.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रकल्प सहाय्यक आणि निरीक्षक
– एकूण रिक्त पदे : 08 पदे.
– नोकरीचे ठिकाण : परभणी.
– शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी., डिप्लोमा किंवा बीएस्सी.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 15,000/- ते रु. 25,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : फलोत्पादन संशोधन योजना (भाजीपाला), उप परिसर, VNMKV, परभणी.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 13 जानेवारी 2025.
– मुलाखतीचा पत्ता : संशोधन संचालनालय, VNMKV, परभणी.