मुंबई : नवीन वर्षात भारतीय शेअर बाजारात मोठ्या घडामोडी दिसून आल्या. पहिल्या दोन दिवसांत बाजाराने मोठी झेप घेतली. मात्र, नंतर त्यातही घसरण दिसून आली. बाजारातील तज्ञांनी एक्सिस सिक्युरिटीजने 2025 च्या टॉप स्टॉक्सची यादी शेअर केली आहे आणि त्यात समाविष्ट असलेल्या स्टॉक्समध्ये 46 टक्क्यांनी वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
यादीतील दुसरा शेअर ॲस्टर डीएम हेल्थकेअर शेअरचा आहे, ज्यासाठी ब्रोकरेजने 613-685 रुपयांची नवीन लक्ष्य किंमत दिली आहे. ॲक्सिस सिक्युरिटीजने अंदाजे 30-46% वरची अपेक्षा केली आहे. बीएसई हेल्थकेअर निर्देशांक 2024 मध्ये 41.5% वाढला आहे आणि ही वाढ 2025 मध्ये चालू राहू शकते. गुरुवारी हा शेअर 522.22 रुपयांवर व्यवहार करत आहे.
तसेच देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस सिक्युरिटीजने त्यांच्या शीर्ष स्टॉक यादीमध्ये समाविष्ट केली आहे. गुरुवारी हा बँकिंग शेअर 1794.30 रुपयांवर व्यवहार करत आहे. ब्रोकरेजने या शेअरमध्ये 15 ते 30 टक्क्यांची वाढ अपेक्षित धरली असून, तो खरेदी करण्याचा सल्ला देताना त्यांनी 1950-2200 रुपयांचे नवीन लक्ष्य ठेवले आहे.
ब्रोकरेज ॲक्सिस सिक्युरिटीजने पायाभूत सुविधा क्षेत्राशी संबंधित असलेल्या कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्सच्या शेअर्सला बाय रेटिंगही दिले आहे आणि ते 513-555 रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात 29-39% वाढ अपेक्षित आहे. हेल्थकेअर इंडेक्सप्रमाणेच बीएसई रियल्टी इंडेक्सनेही 2024 मध्ये 35% झेप घेतली आहे. गुरुवारी हा शेअर ४४९.०५ रुपयांवर व्यवहार करत होता.