लोणी काळभोर : मराठी भाषेतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी जनसामान्यांपर्यंत माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’आवर्जून मराठी भाषेत काढले आहे. दर्पण हे मराठी भाषेतील पहिले नियतकालिक ६ जानेवारी रोजी सुरू केले. त्यांचे स्मरण म्हणून आपण हा दिवस दर्पण दिन किंवा पत्रकार दिन साजरा करतो, असे प्रतिपादन प्रिंट व डीजिटल मिडिया पत्रकार संघटनेचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप बोडके यांनी केले आहे.
लोणी स्टेशन (ता. हवेली) येथील ‘पुणे प्राईम न्यूज’च्या कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुणे प्राईम न्यूजचे मुख्य संपादक व प्रिंट व डीजिटल मिडिया पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर, जेष्ठ सल्लागार तुळशीराम घुसाळकर, समन्वयक तुकाराम गोडसे, हवेली उपाध्यक्ष अमोल अडागळे, अमोल भोसले, जयदीप जाधव, गोरख कामठे, रियाज शेख, हनुमंत चिकणे, विशाल कदम, श्रीनिवास पाटील आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रिंट व डीजीटल मिडिया पत्रकार संघटनेचे सदस्य व उत्कृष्ट सायकलपटू पत्रकार गोरख कामठे यांनी सायकलवर अयोध्या वारी केल्याबद्दल त्यांचा जनार्दन दांडगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पुढील वाटचालीसाठी कामठे यांना संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.