हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक नागरीकाला मिळावा यासाठी आमचे प्रयत्न राहिलेले आहेत. सरपंच गौरी गायकवाड यांनी मागील पाच वर्षात महिलांच्यासाठी व गावच्या विकासासाठी केलेले कामच, या निवडणुकीत आम्हाला जिंकुन देणार असल्याचा विश्वास नवपरिवर्तन पॅनल प्रमुख व सरपंच पदाचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड यांनी व्यक्त केला.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ चा प्रचार शुभारंभ शुक्रवारी (ता. ०९) ग्रामपंचायत हद्दीतील रायलकर कॉलनी मैदान या ठिकाणी नवपरिवर्तन पॅनल प्रमुख व सरपंच पदाचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गायकवाड बोलत होते.
यावेळी सरपंच गौरी गायकवाड, लोणी काळभोरचे माजी सरपंच राजाराम काळभोर, कदमवाकवस्तीचे माजी सरपंच गणपत काळभोर, देवाआण्णा काळभोर, राहुल झेंडे, धनंजय कामठे, जगन्नाथ लडकत, प्रितम गायकवाड, माऊली काळभोर, संजय काळभोर, संदेश काळभोर, अशोक शिंदे, शिवाजी कदम, सूर्यकांत नामुगडे, नंदू काका काळभोर, रमेश कोतवाल, आकाश काळभोर, सिमिता लोंढे, कोमल काळभोर, बिना काळभोर, मंदाकिनी नामुगडे, राजश्री काळभोर, दीपक अढाळे, सुनंदा काळभोर, नासीरखान पठाण, अभिजित बडदे, रुपाली काळभोर, स्वप्नील कदम, अविनाश बडदे, सोनाबाई शिंदे, योगेश मिसाळ, सलीमा पठाण, राणी गायकवाड आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
यापुढे बोलताना गायकवाड म्हणाले, “जिल्ह्यासह तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारात नवपरिवर्तन पॅनेलने चिन्ह जाहीर झाल्यापासून आघाडी घेतली आहे. या सभेला सर्व सामान्य नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता या निवडणुकीत नवपरिवर्तन पॅनेल सर्वच जागी विजयी होणार असल्याचा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला. तसेच कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत प्रत्येक चारशे माणसांच्या मागे एक एकर क्षेत्र रहिवासी झोनमध्ये रूपांतर झाले असते, परंतु मागील सत्ताधाऱ्यांच्या काळामध्ये झालेल्या चुकांचे परिणाम कदमवाकवस्तीच्या नागरिकांना भोगावे लागत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार म्हणजे आज आपल्या समोरच्या पॅनलमधील मंडळीच आहेत.”
सरपंच गौरी गायकवाड म्हणाल्या, “कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीला मागील पंचवार्षिक काळात १२२ कोटी रुपयांची विकास कामे एक महिला सरपंच असताना मंजूर करून त्यांची कामे केली. तसेच ९० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना पुढील ३० ते ३५ वर्षाच्या गावाचा विकास डोळ्यांसमोर ठेऊन तश्या प्रकारे काम सुरु आहे. त्यामुळे केलेल्या कामाच्या जोरावर कदमवाकवस्तीची सर्वसामान्य जनता ही नवपरिवर्तन पॅनेलच्या १७ च्या १७ उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देणार आहे.”
देवाआण्णा काळभोर म्हणाले, “काही प्रभागातील व्यक्तींकडून सर्वसामान्य नागरिकांना धमकाविण्याचे प्रकार सुरु आहेत. घरोघरी जाऊन दमदाटी करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. बाहेरचा मतदार यांना घाबरतो त्यामुळे त्यांना आम्ही जशाच तसे उत्तर देणार आहोत. तसेच मागील पाच वर्षांमध्ये गौरी गायकवाड आणि चित्तरंजन गायकवाड यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे. पाण्याची मोठी योजना त्यांनी मंजूर करून आणली आहे. त्यामुळे विजय आपलाच आहे.”