पुणे : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीचे नाव चर्चेत आले होते. रिया कथितरीत्या सुशांतची गर्लफ्रेंड होती.आता पुन्हा रिया चर्चेत आली आहे ती एका वेगळ्या कारणामुळे. कारण तिच्या आयु्ष्यात एका नव्या खास व्यक्तीची एण्ट्री झाली आहे. आता सुशांतच्या निधानाच्या जवळपास दोन वर्षांनंतर रियाने मूव्ह ऑन केले आहे.
अभिनेत्री रिया ही सीमा सजदेहचा भाऊ बंटी सजदेहला डेट (Bunty Sajdeh) करत आहे. बंटी हा क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील एका मोठ्या व्यवस्थापन फर्मचा मालक आहे. रिया चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून इंटस्ट्रीपासून लांब असली तरी सतत चर्चेत आहे.
तिच्या खासगी आयुष्याविषयी अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात. रियाचा बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सीबीआय, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो यांच्या निशाण्यावर ती होती. त्यानंतर रियाचीही चौकशी झाली.
रियावर सुशांतला ड्रग्ज दिल्याचा आणि त्याची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप होता. यानंतर रिया आणि तिच्या भावालाही तुरुंगात जावे लागले होते. जून 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रियाला अनेक यूजर्सनी ट्रोल केले होते.
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया बंटीला डेट करत होती. तिने सोशल मीडियावर सुशांतसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशांतच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी रिया पुन्हा प्रेमात पडली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये बंटीनेच रियाला मानसिक आधार दिला आहे. परंतु या दोघांच्या नात्याबद्दल अजूनतरी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
रिया पूर्वी बंटीच्या क्लायंटपैकी एक होती आणि जेव्हा सुशांतच्या मृत्यूच्या संदर्भात रियाची चौकशी करण्यात आली तेव्हा बंटीला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. रिया चक्रवर्तीपूर्वी बंटी सजदेहचे नाव सोनाक्षी सिन्हासोबतही जोडले गेले आहे. याशिवाय तो सुष्मिता सेनसोबतही रिलेशनशिपमध्ये होता.
बंटी सजदेह हा अभिनेता सोहेल खानची माजी पत्नी आणि अभिनेत्री सीमा सजदेहचा भाऊ आहे. सीमा ‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ या मालिकेत दिसली होती.