लोणी काळभोर, (पुणे) : आजच्या काळात विद्यार्थीनीना स्वसंरक्षण महत्त्वाचे आहे, समाजातील वाईट घटना घडत असताना त्यातुन बोध घेऊन मुलींना स्वसंरक्षण करण्यात यावे यासाठी महिला संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केल्याचे मत युवासेना तालुका प्रमुख श्रेयश वलटे यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कन्या प्रशाला या ठिकाणी युवासेना हवेली तालुका यांच्या वतीने महिला संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वलटे बोलत होते.
यावेळी युवासेना महाराष्ट्र सहसचिव विशाल सातव, शिवसेनेचे शिरुर हवेली विधानसभा संघटक स्वप्निल कुंजीर, युवासेना हवेली तालुका प्रमुख श्रेयश वलटे, मुख्याध्यापिका निषा झुंजूरके, सुर्यवंशी सर महिला आघाडी जिल्हा समन्वयक उर्मिला भुजबळ, तालुक अध्यक्ष छाया महाडीक, कौशल्या राऊत, अक्षय ननवरे, विकास पवार, तेजस घुसाळकर उपस्थित होते.
शिवसेनेचे शिरुर-हवेली विधानसभा संघटक स्वप्निल कुंजीर म्हणाले, “स्वतःचे संरक्षण करा, चारित्र्याचे संरक्षण करा आई वडिलांचे संरक्षण करा, देशाच संरक्षण करुन चांगले ध्येय बाळगुन चांगल्या भविष्यासाठी कष्ट करा.” आजच्या काळात विद्यार्थीनीना स्वसंरक्षण महत्त्वाचे असल्याचे मत युवासेना महाराष्ट्र सहसचिव विशाल सातव मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, गोल्डन वुशू अकॅडमीचे अजित साळुंखे व कराटे प्रशिक्षक ओंकार पायगुडे, तेजस गोरे, आशिष शितोळे यांनी उपस्थित विद्यार्थीनींना कठीण प्रसंगी स्वसंरक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन युवासेना हवेली तालुका यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना श्रेयश वलटे यांनी केली. तर आभार स्वप्नील कुंजीर यांनी मानले.