Jimmy Carter Passes Away : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे रविवारी वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. ते अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रविवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
जिमी कार्टर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1924 रोजी सामान्य कुटुंबात झाला. ते 1977 ते 1981 दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. आर. फोर्ड यांचा पराभव करत ते 1977 साली राष्ट्राध्यक्ष बनले. 2002 मध्ये त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झालं होतं.
जॉर्जियाच्या प्लेन्स या छोट्याश्या गावात त्यांचा मृत्यू झाला, त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांच्या पत्नी रोझलिनचाही याच घरात मृत्यू झाला होता. ते व्यापारी, नौदल अधिकारी, राजकारणी, वार्ताहर, लेखक होते. आजही त्यांच्या भारत भेटीच्या आठवणी सांगितल्या जातात. त्यांच्याच नावावर हरियाणातील एका गावाचं नाव कार्टरपुरी असे ठेवण्यात आलं होतं.