नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पण, याच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाताना दिसत आहे. मात्र, आता तुम्हाला बेस्ट फीचर असणारा आणि स्वस्तात फोन हवा असेल तर आम्ही तुम्हाला काही पर्यायांची माहिती देणार आहोत. फोन 15 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध झाले आहेत.
POCO M6 Plus 5G स्मार्टफोन हा एक बेस्ट पर्याय आहे. हा स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. यात 6.79 इंचाचा डिस्प्ले असून, जो 120 Hz रिफ्रेश रेटसह येतो. या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये असून, तुम्ही हा फोन Amazon वरून खरेदी करू शकता. तसेच Realme चा NARZO N65 5G हा फोन अल्ट्रा स्लिम डिझाईनसह येतो. यात 6.67 इंचाचा IPS LCD डिस्प्ले असून, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्याची किंमत 12,498 रुपये आहे.
Redmi 13 5G फोन आहे. यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.79 इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. तुम्ही हा फोन Amazon वरून 13,920 रुपयांना खरेदी करू शकता. एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये IQ वरून हा खूप चांगला फोन आहे. यात 50+20 MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8 एमपी कॅमेरा आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंशन 6300 चिपसेट देण्यात आला आहे. त्याची किंमत 11,499 असणार आहे.