मुंबई : मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याचे रूपांतर आता चक्रीवादळात झाले आहे. हवामान विभागाने मंदोस असे नाव या चक्रीवादळास दिले आहे. हे चक्रीवादळ चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकणार असून त्यामुळे तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मंदोस या चक्रीवादळाचा मोठ्या फटका तामिळनाडूतील १३ जिल्ह्यांना बसणार असल्याने या जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या चक्रीवादळाच्या दरम्यान वेग देखील वाढणार असून तो वेग सुमारे ६५ ते ८५ किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळाचा पताका महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना देखील बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील व गुजरात मधील काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात मुंबई व ठाणे यांच्याबरोबरीने काही उपनगरात देखील पावसाची शक्यता आहे.
या मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात सुमारे १२ ते १५ डिसेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात मध्ये बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
SCS Mandous over SW BoB about 200km East of Karaikal at 0530IST of today. To weaken into a CS and cross north Tamil Nadu, Puducherry and adjoining south AP coast between Puducherry and Sriharikota with a windspeed of 65-75 kmph around midnight of today to early hours of 10 Dec. pic.twitter.com/xDM3zJsG43
— India Meteorological Department (@Indiametdept) December 9, 2022