-सागर जगदाळे
भिगवण : भिगवण व भिगवण परिसरात लिफ्टदेण्याचा बहाणा करून लुटणाऱ्या टोळीला भिगवण पोलिसांनी मोठ्या शिताफिने पकडले आहे. या टोळीकडून 54 हजार रुपयांचा माल हस्तगत केला असून भिगवण पोलीस ठाण्यात त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भिगवण पोलिसांकडून मिळालेले माहितीनुसार, शनिवारी (दि.07 डिसेंबर) रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान मौजे भिगवण गावच्या हद्दीत सागर हॉटेल समोरील सोलापुर पुणे रोडवर फिर्यादी लीलाबाई पोपट मोघे, (रा.राजेगाव, ता. दौंड, जि.पुणे) आणि त्यांची ननंद शकुंतला फासगे या रावणगावकडे निघाल्या होत्या. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडी मधुन एक पुरूष व दोन महिला यांनी त्यांना लिफ्ट देण्याचा बहाण करून त्यांना गाडीमध्ये बसवले. त्यानंतर भिगवण गावापासून थोडे पुढे गेल्यानंतर फिर्यादी यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र अंदाजे किंमत रूपये 54 हजार रुपयाचे जबरदस्तीने काढुन घेतले. आणि त्यानंतर त्यांना व त्यांच्या नणंदेला गाडीतुन खाली उतरविले. त्यानंतर ते अज्ञात पुरुष व दोन महिला हे तिथून पसार झाले.
याप्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आरोपी संभाजी भोसले, महानंदा पवार उर्फ महानंदा लीला पवार, ममता भोसले, (सर्व रा. बिसमिल्लानगर, मुळेगाव रोड, उत्तर सोलापुर) यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सदर गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसुत्र त्यांच्याकडून परत घेण्यात आले. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जर्दे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पंकज देखमुख साो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार साो, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा.डॉ. सुदर्शन राठोड साो, उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली विनोद महांगडे, सहा. पोलीस निरीक्षक, भिगवण पो.स्टे, भिगवण पो. स्टेचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण जर्दे, पोलीस अंमलदार रामदास कर्चे, दिपाली खेत्रे यांनी केली आहे.