नवी दिल्ली : सध्या आपण कुठंही सोनं खरेदी केलं तर हॉलमार्क आपल्याला दिसून येतो. ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता सोन्यानंतर चांदीची नाणी आणि दागिन्यांवर हॉलमार्किंगचा नियम लवकरच लागू केला जाऊ शकतो. अशी माहिती समोर आली आहे. त्यानुसार, सरकारकडून यावर वेगाने काम सुरू आहे.
सोन्यासाठी ‘हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन’ (HUID) प्रणाली लागू केल्यानंतर ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स’ (BIS) आता चांदीच्या वस्तूंवर हॉलमार्किंग लागू करण्याची योजना आखत आहे. चांदीवरील HUID चिन्ह दिसणार नाही. चांदीवर हॉलमार्किंग लागू करताना सर्वात मोठे आव्हान म्हणजे चांदीपासून बनवलेल्या वस्तूंवर दीर्घकाळ HUID चिन्ह (हॉलमार्किंग) राखणे.
सोन्यापेक्षा चांदी पर्यावरणीय घटकांसाठी अधिक संवेदनशील आहे. यामुळे, चांदीच्या वस्तूंवर बनवलेले HUID चिन्ह कालांतराने खराब होऊ शकते किंवा मिटवले जाऊ शकते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, एक पद्धत शोधली जात आहे ज्याद्वारे HUID चिन्ह दीर्घकाळ टिकवून ठेवता येईल. चांदीवर हॉलमार्किंग लागू करणे लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते. त्यानुसार, प्रयत्न केले जात आहे.