पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, टाटा मेमोरियल सेंटर मुंबई, टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
टाटा मेमोरियल सेंटर मुंबई, टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे सल्लागार (हेड अँड नेक ऑन्कोलॉजी) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर मुलाखत ही 16 जानेवारी 2025 रोजी दुसरा मजला, एचआरडी विभाग, सर्व्हिस ब्लॉक, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, परेल, मुंबई-४००१२ येथे घेतली जाणार आहे.
यामध्ये शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. एम.सी.एच. / डी.एन.बी. हेड अँड नेक सर्जरी किंवा एम.सी.एच./डॉ. एन.बी. सर्जिकल ऑन्कोलॉजी किंवा एम.एस. / डी.एन.बी. जनरल सर्जरी किंवा MS/डी.एन.बी. ईएनटी किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी असलेला उमेदवार अर्ज करू शकतो. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://tmc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.