लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून गाडीला जाण्यासाठी जागा देण्यावरून मद्यधुंद कार चालकाने पोलिसाशी हुज्जत घातल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी स्टेशन चौकात गुरुवारी (ता. 26) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारस घडली आहे. यावेळी मद्यधुंद चालकाने शिवीगाळ करून रिक्षाची काचही फोडली आहे. मद्यधुंद कार चालकाचे नाव पवार असून तो कोलवडी येथील रहिवाशी आहे. तर पवार याने महावीर लोंढे या पोलिसाशी हुज्जत घातली असून लोंढे हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती मिळत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पवार हा मद्यधुंद अवस्थेत कार चालवीत लोणी स्टेशन चौकात आला होता. तर महावीर लोंढे हे कुटुंबासोबत रिक्षाने चालले होते. तेव्हा कारचालक व रिक्षा चालक यांच्या रस्त्यावरून जाण्यासाठी जागा न मिळाल्याने वाद घातला. तेव्हा पवार याने रिक्षाची काच फोडली. तर लोंढे यांच्याशी शिवीगाळ करून रस्त्यावरच भांडणे केली. यावेळी दोघांमध्ये हातापाई झाली. यावेळी ही भांडणे पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नामदेव चव्हाण, तेज भोसले, शिवाजी भोसले व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पवार याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.