सोलापूर: दुकानासमोरील कट्ट्यावर झोपलेल्या सख्ख्या भावावर सळईने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना रविवार पेठ परिसरातील जोशी गल्ली येथे घडली. शिवाजी कृष्णा भोसले (रा. जोशी गल्ली, रविवार पेठ, सोलापूर) असे जखमी इसमाचे नाव आहे. याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
यातील आरोपी भाऊ संदीप कृष्ण भोसले (रा.जोशी गल्ली, रविवार पेठ, सोलापूर) हा त्यांच्यावर घरगुती कारणावरून चिडला होता. मंगळवारी रात्री शिवाजी भोसले हे जोशी गल्ली येथील एका कट्ट्यावर झोपले असताना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास येऊन तू माझ्या विरोधात वारंवार पोलिसात तक्रार का देतो? असे म्हणत डोक्यात लोखंडी सळईने मारुन जखमी केले. त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अधिक तपास पोहेकॉ दुधाळे हे करीत आहेत.