पुणे : पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी वानवडी परिसरात एका तरुणाचे प्राण वाचवले. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. झाल असं कि, मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे हे कर्तव्यावर निघाले होते. त्यावेळी त्यांना वानवडी परिसरातील जगताप चौकात अपघात झाल्याचे आढळले. एका तरुणाने वृद्ध आजीला दुचाकीची जोरदार धडक दिली.
यावेळी आजींना रक्तस्राव होत होता. त्यांनी त्याच्या खिशातील रूमाल काढून आजींच्या जखमेवर बांधला. मात्र, लागलीच ते त्या तरुणाकडे गेले. तरुणाला फिट आल्यानेच त्याच्याकडून हा अपघात घडल्याचे भाजीभाकरे यांच्या लक्षात आले. फिट आल्यामुळे त्या तरुणाचा जबडा जाम झाला होता. त्यांनी आपले वैद्यकीय कौशल्य वापरून तरुणाला पुन्हा शुध्दीवर आणले.
त्यांनी समय सुचकता दाखवून तरुणाचे प्राण वाचविले. त्यांना एका गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढे जायचे असल्याने त्यांनी आपल्या पोलिस दलातील सहकाऱ्यांना बोलवून रुग्णालयात दाखल करून त्याच्या घरच्यांना कळविण्यास सांगितले. यामुळे पोलिस उपायुक्त डॉ. भाजीभाकरे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
याबाबत बोलताना पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे म्हणाले कि, कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात आयुष्यापेक्षा काही मोठे नाही. अपघाताकडे केवळ न पाहता अपघातग्रस्ताची मदत केली तर त्यांचे प्राण वाचु शकतात. तुम्ही अपघात झालेल्या व्यक्तीला मदत केल्यास पोलिसांकडून तुम्हाला कोणताही त्रास दिला जात नाही. पोलिसांकडून त्रास होतो हा समज चुकीचा आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील अपघात समयी अपघातग्रस्तांना मदतीला धावले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या वैद्यकीय निपुणतेमुळे तरुणास जीवदान!
वानवडीच्या जगताप चौकात एका कारने दुचाकीस्वाराला धडक दिली, ज्यामुळे तो अचानक फिट येऊन रस्त्यावर कोसळला. सदर वेळी त्याच मार्गाने येणारे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी आपल्या वैद्यकीय… pic.twitter.com/ctdPbfYhUc
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) December 24, 2024