-पोपट पाचंगे
रांजणगाव गणपती : शिरुर तालुक्यातील बिबट्याचे माणसांवरील वाढत्या हल्ल्यांचे प्रमाण चिंताजनक असून, ग्रामीण भागात दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.
रांजणगाव गणपती (ता.शिरुर) येथील अष्टविनायक महागणपती चे आरती व दर्शन केल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे बोलत होते. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने दानवे यांचा देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओमकार देव, उपाध्यक्ष संदीप दौडकर व राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व महागणपतीची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख पोपटराव शेलार, संदीप शिंदे, किरण देशमुख, राहुल शिंदे, युवा उद्योजक रावसाहेब पाचुंदकर, ओंकार जवक, विशाल शेळके, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, संदीप रणपिसे आदि उपस्थित होते.
रांजणगाव गणपती देवस्थानच्या विविध विकासकामांचे कौतुक करत उर्वरित महत्वपूर्ण विकासकामांच्या निधीकरिता शासन दरबारी आवश्यक ते सर्वोत्तोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन विरोधी पक्षनेते दानवे यांनी यावेळी दिले.