पिंपरी : पतीने चापट मारल्याने खाली पडून जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सोमवारी (दि.२३) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. खुशबू राजकरण हरीजन (वय २८, रा. जयभीम प्रार्क, आळंदी रोड, भोसरी) असे मृत्यूमुखी पडलेल्या पत्नीचे नाव आहे. पोलीस हवालदार सचिन दत्तात्रय गोगावले (वय ४४) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजकरण गणेशप्रसाद साकेत (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वनाथ चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ डिसेंबर रोजी आळंदी रोड, भोसरी येथे रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. आरोपी राजकरण याचे पत्नी खशबू हिच्यासोबत भांडण झाले. रागाच्या भरात आरोपी राजकरण याने पत्नी खुशबू हिला चापट मारली. त्यामुळे ती खाली पडून तिच्या डोक्याच्या मागील बाजूला दुखापत झाल्याने रुग्णालयात दखल केले. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दुखापतीमुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे आरोपी राजकरण याच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.